तुकारामबीज_जगदगुरु_तुकोबारायांचा_सदेही_वैकुंठगमन_सोहळा🙏🌸🌺
"बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥"
किती सार्थ शब्दात तुकोबारायांच्या किर्तीचे वर्णन संत श्रीबहिणाबाईंनी केले आहे. "आम्ही वैकुंठवासी" म्हणणारे उद्धव ,प्रह्लादांचे अवतार असलेले तुकोबाराय एक सर्व सामान्य वैष्णव घरात जन्माला येतात काय ,सर्व सामान्य माणसांप्रमाणे संसार करातात काय आणि हे जिवन जगतांना स्वतः परब्रह्म श्रीपंढरीनाथांची भक्ती करुन पांडुरंग स्वरुप होतात काय, सर्व कसं एका अलौकिक चमत्कारापेक्षा वेगळं नाही आणि हे तुकोबारायांनी का केले तर त्याचे ही उत्तर त्यांनी आधीच देऊन ठेवले आहे.तुकोबाराय म्हणतात , "बोलिले जे ऋषि । साच भावे वर्ताया ।।" म्हणजे तुम्हा-आम्हा साठी त्यांनी ते आचरण करुन दाखविले आणि आपल्या सर्वांपूढे ,या जगापुढे एक उदाहरण प्रस्तुत केले की भगवंतांच्या निश्चळ ,निर्मळ भक्तीने आपल्याला ही वैकुंठाची कास पकडता येईल. जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र आपल्याला बहुतेक माहित आहेच असे मी समजतो आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे तुकोबारायांच्या जन्मतिथी वसंत पंचमीला एक लेख लिहिल्या गेला त्यात थोड्याफार लिला चरित्राचे चिंतनही केले आहे म्हणून परत ते इथे मांडत नाही.त्या लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी देतो.
आजच्या लेखाचा मुळ मुद्दा म्हणजे पिवळ्या पावट्यांनी , तथाकथित समाजसुधारक गाढवांनी जी एक गेल्या काही काळापासून बोंब उठवली की तुकोबांचा खून झाला त्यावर मुद्दाम चिंतन करायचे आहे.मुळातच ही जी हिरवी आणि पिवळी पिल्लावळ आहे ती धर्म , श्रद्धा आणि साधना यापासून हजारो मैल दूर आहे. हे लोक गाढवासारखे हेतुपुरस्सर गाथेतील निवडक अभंग उचलून त्यावर लिहुन आपलीच लाल करत असतात.पण तुकोबारायांचे अद्वैत प्रतिपादन करणारे , निर्गुण भगवंतांच्या वर्णनाचे , पांडुरंग , वैष्णवांच्या भक्तीचे अभंग कधीही बघत नाहीत.मुळातच तुकोबा असोत की इतर सर्व संत यांच्या बद्दल तुम्ही लौकिक पातळीवर विचार केला तर सर्व कसं अशक्यप्राय आणि कल्पनातीतच वाटेल.कारण आपली बुद्धी ही तिथवर पोचत नाही.पण जर ऋषिमुनींनी तसेच धर्मशास्त्रात केलेल्या वर्णानाचे नुसते वाचन जरी केले तरी लक्षात येईल की हे अलौकिक आहे आणि आपल्या विचारांच्या पलिकडे आहे.माउलींनी आपल्या "अनुभवामृत" म्हणजेच "अमृतानुभव" या ग्रंथांत योग्यांना साधनापथावर साधनेतील आलेल्या अलौकिक अनुभवाचे वर्णन केले आहे पण काय आहे ना आपली लायकी जेव्हा त्यावर चिंतन करायची नसली की आम्ही ते सर्व खोटं ठरवणार .बरं गम्मत अशी की हीच हिरवी आणि पिवळी पिल्लावळ ७२ हूर ,जिहाद ,जन्नत यावर चकार शब्दही काढत नाही.कारण हिंदू हा सोशीक आहे ना, दुर्दैव हे की इथे बोलणारे हे गाढवं याचेच एक भाग आहेत.असो पण मुद्दा हा की माउलींनी चालवलेली भिंत असो की रेड्याच्या मुखी वेद वदवने असो ,तुकोबांचे वैकुंठगमन असो की मुक्ताईंचे गुप्त होणे असो यावर आपल्या तोकड्या बुद्धीचे तारे तोडणे म्हणजे इथून चंद्राला हात लावणे होईल. बरं महत्वाचं असं की पातंजल योग सुत्रात समाधी ,ध्यान ,धारणा,योग, कुंडलीनी शक्ती,सप्त चक्र याबद्दल आणि इतर सर्व धर्म ग्रंथात मग त्यात माउलींची भावार्थदीपिका असो की तुकोबारायांची गाथा या सर्व क्रमाचा आणि साधनेचा उहापोह केला आहे पण या गाढवांना सांगेल कोण? वैकुंठ या शब्दाचा हिंदू धर्मात केलेला अर्थ ही फार भिन्न आहे पण आम्हाला टिव्ही बघून वैकुंठ म्हणजे काहीतरी भन्नाट ,आकाशात तरंगाणारे रेस्ट हाऊस वाटतं यात देवांची किंवा संतांची चुक नाही.आम्हा अडाण्यांना त्याचा विचारच जर करायचा नसेल तर त्याला कोण काय करणार ?? तुकोबांनी सांगुनच ठेवले होते "आम्ही वैकुंठवासी" मग याचा अर्थ काय लावणार??? तुकोबारायांंनी वैकुंठ काय पृथ्वीवरील स्थुल वस्तु किंवा स्थानाला नक्कीच म्हटले नाही.भागवत,पुराणातील हे वैकुंठ आहे. याचा तुकोबांनी अभ्यास केला होता आणि या उपनिषद,शास्त्र,पुराण यांचे वर्णन ही त्यांच्या अभंगात जागोजागी दिसून येते.तुकोबांचे प्रयाण ही एक असामान्य आणि अलौकिक घटना आहे आणि ती आपल्या बुद्धी प्रामाण्यावादाच्या चाकोरीत बसणारी नाही. "संत होऊन संतांना ओळखता येतं" हे वचण म्हणजे बाळचेष्टा नाही तर ही वस्तुस्थिती आहे. शेगावच्या गजानन महाराजांनी अलिकडच्या काळात वाळलेल्या आंब्याला पालवी फोडली होती आणि ही घटना बघणारे लोक आतापर्यंत जिवंत होते.
दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की तुकोबांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज देहूत यायचे.साधा आजचा नगरसेवक जरी असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांना इतकी मस्ती असते तर मग स्वराज्याचे संस्थापक छत्रपती असलेल्या शिवरायांच्या गुरु किंवा मार्गदर्शक असलेल्या तुकोबारायांवर नजर वर करण्याची ही कुणाची ताकद असेल का?? देहू हे गाव हिमालयात नाही तर महाराजांनी वसवलेल्या पुण्याचा भाग आहे हे विसरून चालणार नाही.पुण्यातुन दिल्लीची खबर ठेवणारे शिवराय देहूत घडणार्या घटनांची नोंद ठेवणार नाहीत असा बालीश विचार ही करवत नाही. महत्वाचे हे की तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर काही दिवसांनी तुकोबारायांचे चिरंजीव श्रीमहादोबास स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी वर्षासानाची सनद दिल्याची नोंद आजही उपलब्ध आहे.तसेच शाहू छत्रपतींनी ही तुकोबारायांचे पुत्र नारायणबुवा यांना तिनं गावे इनाम दिली आहेत आणि या पत्रात तुकोबारायांच्या वैकुंठवगमनाचा स्पष्ट उल्लेख आहे.औरंगजेबाच्या नाकी नऊ आणणारे छत्रपती शंभु महाराज असचं मनात आलं म्हणून एखादी कृती करतील असे ज्यांना वाटते त्यांनी गटारात जिव दिला तरी हरकत नसावी. आपण इथे थोरले छत्रपति शिवराय व धाकटे छत्रपती शंभु महाराज यांच्या बद्दल बोलतोय आणि त्यांची गुप्तहेर संघटना ,त्यांचे मावळे त्याकाळात कसे कार्यरत होते हे जर बघायचे असेल तर वा.सी.बेंद्रे, मेहेंदळे सरांचे शिवचरित्र जरुर अभ्यासा म्हणजे आपल्या मेंदूला लागलेली जळमटं गळून पडतील.बरं प्रत्यक्ष दोन्ही छत्रपतींनी हे मान्य केल्यावर त्यावर अकलेचे तारे तोडणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे.ज्या लोकांनी वैकुंठगमनावर प्रश्न उभा केला ती पिवळी ,हिरवी पिल्लावळ खरंच कुणाच्या पाठिंब्याने हे करत आहेत याचा विचार होणे ही गरजेचे आहे. छुप्या संघटना ,हिरव्या लांड्या संघटना तर यांना पुरवठा करत नाही ना? याचा विचार प्रत्येक हिंदू ने करायलाच हवा. छत्रपतींच्या एखाद्या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आम्हाला देव,धर्म आणि हिंदवी स्वराज्याचे द्रोही आहेत आणि असल्या किड्यांना वेळीच चिरडायला हवं हे माझं स्पष्ट मत आहे.
जगद्गुरु तुकोबारायांचे आत्मानुभवाने आणि ब्रह्मतदाकार वृत्तीचे अभंग या सर्व तथाकथील पिवळ्या बुद्धीच्या इतिहासकारांनी वाचले तरी यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.त्या अभंगांवर बोलतांना यांची वाचा खुंटते.तुकोबारांयांच्या वैकुंठगमनाचे साक्षीदारांची यादी जरी बघितली तरी आश्चर्य होईल.१) संत कान्होबा २) रामेश्वर भट्ट वाघोलीकर ३) संत शिंपी नामा ,सदुंब्रेकर ४) गंगाधर मवाळ कडूसकर ५) संताजी जगनाडे तेली ६)नावजी माळी देहूकर ७) गवरशेट वाणी ८)शिवाजी कासार लोहगावकर ९) कोंड भट्ट पुराणीक १०) मालजी गाडे येलवडीकर १२) मल्हारपंत चिखलीकर १३) रंगनाथ स्वामी निगडीकर १४) महंत कचेकर ब्रह्मे हे सर्व तात्कालिक जे या अद्भुत घटनेचे साक्षी होते.
१५) नंतरचे संत नारायण बुवा देहूकर १६) बाळाजी जनागडे १७) गोपाळ बुवा देहूकर १८) वासुदेव महाराज देहूकर १९) कवी मोरोपंत २०) प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजा मानानं या सर्व संतांनी तुकोबाराय आमच्या डोळ्यासमक्ष सदेही वैकुंठास गेले असे निश्चित सांगितले आहे. मग या सर्वांचे अनुभव खोटे आणि ही पिवळी ,हिरवी पिलावळ खरी असे मानणारे महामूर्ख आणि नक्की कोण ,यांचा उद्देश काय यावर चिंतन होणे गरजेचे आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या १३५ ग्रंथाचे खंडन तर दूर त्याची फक्त यादी जरी पाहिली तरी ही हिरवी पिल्लावळ धाय मोकलून रडेल यात शंका नाही.
या सर्व भामट्या ,अर्धवट हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिरव्या - पिवळ्या पुरोगाम्यांनी आधी तुकोबांच्या प्रत्येक अभंगाचा अभ्यास करायला हवा पण असे म्हणने ही हास्यास्पद ठरेल.कारण आम्ही कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करणार नाही ही यांची भिष्मप्रतिज्ञाच असावी असे दिसते आणि संतांच्या आत्मज्ञानाचे,स्वानुभवाचे वर्णन यांच्या पचनी पडतील असे दूरान्वेही वाटत नाही. असो आजच्या या परम पावन दिनी तुकोबारायांच्या श्रीचरणांशी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि तुकोबारायांनी आम्हालाही श्रीहरी स्मरणाची बुद्धी द्यावी हीच अनन्य प्रार्थना करतो.
✒️✍️अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️
