#आज_आपल्या_आबासाहेबांची_म्हणजे_श्रीकृष्ण_सरस्वती_दत्त_महाराजांची_१८६वी_जयंती🙏🌸
काषायवस्त्रं मनिहारभूषितम् ।
सिंहासनस्थ श्रितभक्त व्यापीतम् ।
अनाथ नाथं करवीर वासीतम् ।
श्रीकृष्ण देवं शरणं प्रपद्ये ।।
#श्रीपैजारवाडी_निवासी_चिलेदेव_व_आबासाहेब:-
श्रीपैजारवाडीचे दत्त श्रीचिले महाराज यांना श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजां बद्दल अनन्य प्रेम व आदारभाव होता. ते परब्रह्म भगवंत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांना तात्यासाहेब व श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांना आबासाहेब असे संबोधीत. करवीरात ते आबासाहेबांच्या वैराग्य मठी म्हणजे समाधी मठीच्या पायर्यावर कित्येकदा बसुन राहत. एकदा कुणा एक नतद्रष्ट माणसाने आबासाहेबांच्या समाधी मठीच्या पायरीवर रात्रीच्या अंधारात येऊन घान टाकली व ही बातमी चिले महाराजांना अंतर्ज्ञानानेच कळली..ते तडक कुंभारगल्लीत आले ,आपल्या सोबतच्या भक्ताला लक्स साबन आणायला लावले व आपल्या हाताने ती घान साफ करुन पायर्या व सर्व कुंभार गल्ली धुऊन काढली. असे चिलेदेवांचे अनन्य प्रेम आबासाहेबांवर होते. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे प्रत्यक्ष गाणापुरचे आणि नृसिंहवाडी चे दत्त. गाणगापूर व वाडीला अनुष्ठान करणार्या कित्येक भक्तांना देवांनी दृष्टांत देऊन सांगितले होते की आम्ही करवीरात कुंभार गल्लीत देह धारण करुन राहत आहोत व त्यांना सेवेला तिकडे बोलावून घेतले होते असे असंख्य प्रसंग श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चरित्रात बघायला मिळतात. श्रीआबासाहेब हे बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती धारण करुन राहत असत.
कोल्हापूरातील कुंभार आळीतील श्रीताराबाई शिर्के या दत्तभक्त स्त्रीला पूर्वकर्माने पोटशुळाची व्यथा जडली.त्याचा परिहार व्हावा म्हणून ती बाई दर पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जात असे.त्या वाडीला एक दिवस मुक्काम करुन दुसर्या दिवशी परतत असे .अशी अनेक वर्षे सेवा केल्यावर एके रात्री वाडीस त्यांना श्रीदत्तगुरूंनी स्वप्नदृष्टान्त देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून लवकरच तुझ्या घरी राहावयास येईन. त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीत श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. श्रीताराबाईंच्या अनन्य भक्तीला जणू भगवंतांने आपले स्वत:च दान दिले होते.ते त्यांचे घर सोडून कुठेही कधीही गेले नाही. कुठे गेले तरी ते ताराबाईंकडे परत येत.श्री दत्त प्रभुंच्या अतिव करुणा कृपेचा हा जणू आविष्कारच होता. ताराबाईचे अनंतकोटी जन्माचे पूण्य फळाला आले व प्रत्यक्ष वाडीचे दत्तच त्यांच्या घरी येऊन लिला करते झाले. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांनी ताराबाईच्या या वाड्याला वैराग्य मठी असे नाव दिले. हीच वैराग्य मठी आज आबासाहेबांचे समाधी मंदीर आहे. श्रीआबासाहेबांनी अनंत लिला , शेकडो लोकांचे अपार कल्याण याच वैराग्य मठीत केले व आपला देहही याच मठीत ठेवला. शेवटी आबासाहेबांच्या देहाला समाधीही इथेच दिली गेली. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌼🌸🌺
✍️✒️अक्षय जाधव आळंदी✒️✍️

No comments:
Post a Comment